मोठी अपडेट! राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; येथे अर्ज सादर करा

Anganwadi Bharti Maharashtra : महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे.

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदे ही 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्यात येत आहे.

अंगणवाडी मदतनीसांच्या पदभरतीसाठी (Anganwadi Bharti Maharashtra) संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरीकडून स्थानिक स्तरावर जाहिराती देण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी जाहिरात, आवश्यक पात्रता संपूर्ण माहिती येथे पाहा

आवश्यक पात्रता

जाहिरातीनुसार मदतनीस पदासांठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयोमार्यादा ही 18 ते 35 वर्षे वयोगटातील आणि विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

येथे अर्ज सादर करा

इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत,असे आवाहन आयुक्त पगारे यांनी केले आहे.

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत राज्यातील 14 हजार 690 मदतनीसांची रिक्त पदे (Anganwadi Bharti 2024) भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! सर्व जिल्हा जाहिराती प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

राज्यातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी अपडेट पाहा

Anganwadi Bharti : अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक माहिती पाहा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे नवीन अपडेट येथे पाहा

Leave a Comment