अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीच्या नियमांत मोठे बदल – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा! Anganwadi Bharti 2025

Anganwadi Bharti 2025 : महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. 30 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या पदभरतीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

🔹 नवीन सुधारित भरती प्रक्रिया

सरळसेवेने निवड होणार.
गुणांकन प्रणालीमध्ये सुधारणा.
नवीन शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा विचार.

📌 पात्रता आणि गुणांकन पद्धत

📍 बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • 80% पेक्षा जास्त = 60 गुण
  • 70.01 ते 80% = 55 गुण
  • 60.01 ते 70% = 50 गुण
  • 50.01 ते 60% = 45 गुण
  • 40% ते 50% = 40 गुण

📍 अतिरिक्त गुण

  • पदवीधर: 10 गुण
  • पदव्युत्तर शिक्षण: 4 गुण
  • D.Ed / B.Ed: 2 गुण
  • MS-CIT किंवा मान्यताप्राप्त संगणक अभ्यासक्रम: 2 गुण
  • अनुभव (2 वर्षांहून अधिक): 5 गुण
  • विधवा / अनाथ उमेदवार: 10 गुण
  • SC/ST उमेदवार: 5 गुण
  • OBC / भटक्या विमुक्त जाती / EWS: 3 गुण

महिला व बालविकास विभागात १८,८८२ पदांची भरती

ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक

🔹 नवीन भरती प्रक्रिया कशी असेल?

🏡 ज्या प्रकल्पांत आधीच्या नियमांनुसार (Anganwadi Bharti) भरती प्रक्रियेस सुरुवात झाली होती, ती रद्द करून नवीन नियमांनुसार प्रक्रिया राबवली जाईल.
🏡 अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार.
🏡 भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणार.

📢 अधिकृत शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती

#AnganwadiBharti

Leave a Comment