मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन Additional Assistant Superintendent

सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका (Additional Assistant Superintendent) पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१५ जानेवारी, २०२५ रोजी पर्यंतअर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Additional Assistant Superintendent या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक, आजी सैनिक यांची पत्नी असावी (युध्द विधवेस/विधवेस प्राधान्य).

शिक्षण : दहावी उत्तीर्ण असावे तसेचएम.एस.सी.आय.टी. पास व टायपिंग येणा-यास प्राधान्य. वयोमर्यादा -४५ वर्षाच्या आत. मानधन दरमहा २४ हजार, ४७७ इतके आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इतर जॉब्स : विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहाITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा

अर्जासोबत : युध्द विधवा,विधवा, माजी, आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवणेत आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

महत्वाचे अपडेट्स : कंत्राटी कर्मचारी | अंगणवाडी कर्मचारी | सरकारी कर्मचारी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकराष्ट्रीय आरोग्य अभियान भरती येथे पाहा

अधिक माहितीसाठी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रुझ (पु.), मुंबई-४०००५५. दूरध्वनी : ०२२-३५०८३७१७ येथे संपर्क साधावा.

Leave a Comment