Teacher Regularization : राज्यातील विशेष शिक्षकांच्या 18 वर्षांच्या संघर्षाचा आज गोड शेवट झाला, त्यांच्या संघर्षपूर्तीत मलाही खारीचा वाटा उचलता आल्याचे मनस्वी समाधान झाले असल्याचे आमदार,औसा विधानसभा मतदारसंघ श्री अभिमन्यु पवार (Abhimanyu Pawar) यांनी X वर पोस्ट केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे राज्यातील हजारो विशेष शिक्षक “विशेष शिक्षक पदांची निर्मिती करुन त्यांना सेवेत सामावून घ्यावे” या मागणीसाठी मागच्या 18 वर्षांपासून संघर्ष करत होते, मतदारसंघातील काही विशेष शिक्षकांनी हा विषय माझ्यापर्यंत आणल्यानंतर मी या विषयाचा पाठपुरावा सुरू केला आणि सवयीप्रमाणे हा विषय लावून धरला.
माझ्या विनंतीवरून या विषयासंदर्भात मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि 6 ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली, आर्थिक तरतूदीसह 3100 विशेष शिक्षक पदांची निर्मिती करुन विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत झाला.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

विशेष शिक्षकांच्या १८ वर्षांच्या संघर्षाचा आज गोड शेवट झाला, त्यांच्या संघर्षपूर्तीत मलाही खारीचा वाटा उचलता आल्याचे मनस्वी समाधान झाले असल्याचे X वर पोस्ट करत त्यांनी कळविले आहे. तसेच मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde
जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा व शालेय शिक्षण मंत्री मा श्री @dvkesarkar
जी यांचे मनःपूर्वक आभार मानले. माझ्या मतदारसंघासह राज्यभरातील 3100 विशेष शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन देखील आ. अभिमन्यु पवार यांनी केले आहे.
आता लक्ष शासन निर्णयाकडे येथे पाहा
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी