Ladaki Bahine Yojana High Court Decision : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय होती याचिका?
माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladaki Bahine Yojana) म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. या योजनेस तातडीने स्थगिती देण्यात यावी. यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत 14 ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.
लाडक्या बहिणींना मोफत गॅस हवाय का? मग हे काम आत्ताच पूर्ण करा
मा. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली. (Ladaki Bahine Yojana High Court Decision) या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास मा. उच्च न्यायालयाणे नकार दिला आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेची नवीन वेबसाइट सुरू
त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची विश्वासर्हता वाढली असल्याने लाडक्या बहिणींचा विजय झाल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले असून, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा
लाडक्या बहिणींचा विजय – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळले आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या समतावादी विचारांवर आधारित, कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी, राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा
केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X च्या माध्यमातून पोस्ट करत माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे आहेत ना ? मग आताच पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम