Employee Provident Fund : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वार्षिक विवरण सेवार्थ पोर्टलवर अपलोड

Employee Provident Fund : राज्यातील वर्ग-4 चे कर्मचारी ज्यांचे त्यांच्या भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वर्ष 2023-24 चे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)- II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयाच्या वेबसाइट तथा महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत, असे वरिष्ठ उप महालेखाकार (निधी), कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व ह.) यांनी प्रसिद्धपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र राज्याचे वर्ग-4 शिवायचे कर्मचारी, ज्यांचे भविष्य निर्वाह निधि लेखे कार्यालय प्रधान महालेखाकार (ले. व ह.) -11, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयात ठेवले जातात.

गुड न्यूज! जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाचे परिपत्रक येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधि (Employee Provident Fund)लेख्यांचे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले. व ह.) II, महाराष्ट्र, नागपूरच्या वेबसाइट लिंक https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login वर पाहु शकतात.

कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात आरोग्य विभागाचा सुधारित शासन निर्णय पाहा

कर्मचारी आपले वार्षिक विवरण फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये डाउनलोड पाहण्यासाठी/ व प्रिन्ट करण्यासाठी https://sevaarth.mahakosh.gov.in/ या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पाहू शकतात.

आशा सेविका लेटेस्ट अपडेट पाहा

भविष्य निर्वाह निधी लेखे संदर्भात महत्वाच्या सूचना

महाराष्ट्र राज्याचे सर्व कर्मचारी, ज्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे या कार्यालयात ठेवले जातात, त्यांनी कृपया खालील मुद्द्यांचे अनुपालन करावे जेणेकरून नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करून सेवानिवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधि मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळता येईल.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन आदेश जारी

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)- II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयात नोंदणी कृत करुन घेणे आवश्यक आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा

जेणेकरुन सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यामधील जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रिम राशि तसेच भविष्य निर्वाह निधी अंतिम आहरणच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्याच्या प्राधिकृत होण्यासंधीचा संदेश या कार्यालयाद्वारा पाठवला जाऊ शकेल.

लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल (वेबसाईट) येथे पाहा

ज्या कर्मचाऱ्यांनी अजुन आपला मोबाइल क्रमांक या कार्यालयात नोंदणीकृत केला नसेल त्यांनी आपला मोबाइल क्रमांक (fm.mh2.ae@cag.gov.in) ह्या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे व. लेखा अधिकारी / निधि विविध यांना आपले पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठवावा.

सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्म तारीख भविष्य निर्वाह निधीविवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावेत, तफावत असल्यास आपले नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणाली मधे सुधारित करून संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे आपले बरोबर असलेले नाव व जन्म तारीख या कार्यालयाच्या अभिलेख्यामधे दुरुस्त करण्यासाठी कर्मचार्याच्या सेवार्थ_आयडी (Sevaarth_ID) सह (gpftakrarngp@gmail.com) वर ई-मेल पाठवावा.

राज्यातील कर्मचा-यांच्या अनुकंपा नियुक्ती संदर्भात शासन निर्णय पाहा

कृपया सर्वांनी हे सुनिश्चित करावे की सेवार्थ प्रणाली तसेच भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) विवरण पत्रात अभिदात्याचे पूर्ण नाव नमूद केले आहे. लवकर माहिती साठी (gpftakrarngp@gmail.com) वर ई-मेल पाठवावा.

कर्मचारी या कार्यालयाच्या वेबसाइटवर https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login लॉग इन केलेल्या आपल्या भविष्य निर्वाह निधि लेख्याची सद्यस्थिती पाहू शकतात.

वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी, तुमचा मोबाइल क्रमांक या कार्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसल्यास, ‘Forgot Password’ या आयकॉन वर क्लिक केल्यानंतर, तुमचा जीपीएफ खाते क्रमांक प्रविष्ट करून आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एस.एम.एस. द्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल.

कृपया भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सीरीज व पूर्ण नाव बरोबर लिहिलेले आहे हे सुनिश्चित करावे. जर मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेल्या अग्रिमाची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झालेली नसल्यास, सम्बंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातुन कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांक, अनुसूची / प्रमाणकाची राशी, अनुसूचीच्या प्रती बरोबर पाठवावे, जेणेकरुन नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांची लेख्यामधे नोंद होईल व भविष्यात सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधिची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईल. चांगल्या सेवेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन, वरिष्ठ लेखाधिकारी / लेखा निधि विविध यांनी प्रसिद्धपत्राद्वारे केले आहे.

Leave a Comment