राज्यातील महिला, मुलींसह तरुण आणि नागरिकांसाठीच्या ‘7’ लोकप्रिय सरकारी योजना

Government Scheme Maharashtra : राज्यातील सर्व घटकांसाठी महत्वाचे निर्णय राज्य शासनाने मागील दिवसांमध्ये घेतले असून, या योजनेची माहिती कविवर्य सुरेश भट (नागपूर) सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील तीन नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती व निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’तील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे वाटप आणि आशा सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.

1) राज्यातील 2.5 कोटी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना

राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2) मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय

राज्यात मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षणासह खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 507 अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

3) महिलांना तीन सिलेंडर मोफत मोळणार

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना (Government scheme Maharashtra) आणली आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

4) एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50% सुट देण्याचा निर्णय

महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50% सुट देण्याचा निर्णय घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे.

5) राज्यातील 10 लाख तरुणांसाठी लाडका भाऊ योजना (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण)

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील 10 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिन्याला दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीनंतर त्यांना प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनेमध्ये नोकरी मिळू शकेल. याशिवाय शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांतर्गत त्यांना स्वयंरोजगारासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

6) महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत

गोर-गरीब जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री आरोग्य कक्षाद्वारे गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या सोयी -सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्वच नागरिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याची सोय करुन देण्यात आली आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

7) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Government scheme Maharashtra) राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये राज्यातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता येणार आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आला आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी अधिक वाचा..

आशा सेविकांना मोबाईल फोनचे वाटप; रिचार्जसाठी देखील पैसे मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Leave a Comment