आशा सेविकांना मोबाईल फोनचे वाटप; रिचार्जसाठी देखील पैसे मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Asha Sevika Latest News : आशा सेविकांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले, यावेळी आशा स्वयंसेविकांना मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आशा सेविकांना वाढीव मानधनासह 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सविस्तर वाचा..

आशा सेविकांचे मोलाचे योगदान

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, माता व बालमृत्यू तसेच कुपोषण रोखण्यासाठी आशा सेविका मोलाचे योगदान देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही त्या योग्यरित्या पार पाडत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आशा सेविकांना मोबाईलसह रिचार्जसाठी पैसे

आशा सेविका यांच्या कामामध्ये सुकरता यावी आणि त्यांना विविध नोंदी घेता याव्यात, माहितीचे संकलन करता यावे यासाठी जिल्हा खनिज निधीतून त्यांना मोबाईल वितरित करण्यात आले आहे. प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील 130 आशा सेविकांना अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले. त्यांच्या मागणीनुसार येत्या काळात या मोबाईलसाठी जिल्हा खनिज निधीतून वार्षिक रिचार्जसाठी निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील ‘7’ लोकप्रिय सरकारी योजना

आशा सेविकांना वाढीव मानधनासह 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय

आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. यासोबतच आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवारांना प्रातिनिधिकरित्या नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल (वेबसाईट) येथे पाहा

आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप

Asha Sevika Latest News : कविवर्य सुरेश भट (नागपूर) सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील तीन नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती व निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’तील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा

कर्मचारी अपडेट : अंगणवाडी कर्मचारी | NHM कर्मचारी | कंत्राटी कर्मचारी | आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, परिणय फुके, अनिल देशमुख, अभिजीत वंजारी, टेकचंद सावरकर, सुधाकर आडबाले, प्रवीण दटके, कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय पाहा

Leave a Comment