BAMS Students Latest Update : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (BAMS) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी (Postgraduate Ayurvedic Education) राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता.
राज्याच्या 85% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70%कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून BAMS केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा
राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री यांनी घेतला निर्णय – पाहा
दिनांक 3 ऑगस्ट रोजी वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार