आनंदाची बातमी! अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा! आता ‘या’ निदेशकांनाही मिळणार नियुक्ती

Anshkalin Nideshak : दिनांक 2 जुलै 024 रोजी मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मा. उपाध्यक्ष आणि मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जे अंशकालीन निदेशक न्यायालयात गेलेले नाहीत अशा अंशकालीन निदेशकांनाही हजर करुन घेण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार आता या निदेशकांची देखील (खालील) माहिती मागविण्यात आली आहे.

सन 2024-25 च्या यु-डायस डेटानुसार इयत्ता 6 वी ते 8 वी च्या 100 च्या वर पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कला, क्रोडा व कार्यानुभव या विषयाकरिता प्रत्येकी 1 याप्रमाणे अंशकालीन निदेशक नियुक्त केले जातात.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली कायमस्वरूपी नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षण मंत्री यांनी दिले हे निर्देश

मा. उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!

राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षण यात गोडी वाढावी म्हणून समग्र शिक्षामार्फत या वर्गांना अतिथी निदेशक अर्थात अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र या शिक्षकांच्या नियुक्ती व मानधन प्रश्नी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे या निदर्शकांच्या वतीने रिट याचिका 8786 दाखल करण्यात आली होती.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना मानधन, कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय

सन २०१८ पासून अतिथी निदेशकांचे नियुक्त प्रकरण न्यायालयीन कारणाने राखडलेल्या होत्या. या याचिकेची ८ मे २०२४ रोजी मा. उच्च न्यायालय मुंबईमध्ये सुनावणी होऊन या अतिथी निदेशक यांना तातडीने नियुक्ती (Appointment) देण्याबाबतचे निर्देश मा. न्यायालयाने दिले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा

सेवा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांची शासनाने मागवली माहिती

मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्र.8786 मध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी आदेश दिल्यानंतर या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत. त्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांची माहिती शासनाने मागवली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

त्याअनुषंगाने, मा.न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या अंशकालीन निर्देशांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यावेळी कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांची शाळानिहाय माहिती मागविण्यात आली आहे.

शिक्षण सेवकांच्या मानधनात तब्बल 10000 हजारांची भरघोस वाढ

त्यानुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मा. न्यायलयाचे आदेशानुसार सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन निदेशकांची (Anshkalin Nideshak) माहिती मध्ये संबंधित जिल्हा परिषद, मनपाचे नाव, तालुक्याचे नाव, केंद्राचे नाव, सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन निदेशकांचे नाव, नियुक्तीचा दिनांक, सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील सेवेचा कालावधी आणि अभिप्राय या मुद्याची माहिती मागविण्यात आली आहे.

त्यानुसार आता राज्यातील सर्वच पात्र अंशकालीन निदेशक (Anshkalin Nideshak) यांना नियुक्ती मिळणार असल्याचे या निदेशकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अधिक माहितीसाठी : परिपत्रक येथे पाहा

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा

Leave a Comment