Gramin Dak Sevak Apply Online : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३ मार्च २०२५ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी केले आहे.
महत्त्वाची माहिती
- अर्ज प्रक्रिया: फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. कोणतेही ऑफलाईन किंवा व्यक्तिशः सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- शुल्क भरावे लागेल: अधिसूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार अर्ज शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान! भारतीय डाक विभाग कोणत्याही उमेदवारांना थेट फोन कॉल करत नाही. निवड प्रक्रियेबाबत सर्व पत्रव्यवहार अधिकृत प्राधिकरणाद्वारेच केला जातो.
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती!
महत्त्वाच्या सूचना
- वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि नोंदणी क्रमांक इतरांना शेअर करू नका.
- कोणत्याही अवैध कॉल्स किंवा खोट्या ऑफरपासून सावध राहा.
- अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://indiapostgdsonline.gov.in/
Gramin Dak Sevak Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२५ – संधीचा लाभ घ्या!
कनिष्ठ लेखापाल भरती 2025 – सरकारी नोकरीची मोठी संधी! त्वरित अर्ज