RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. तर 85 हजार 406 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. आता निवड झालेल्या विद्यार्थ्याना RTE Admit Card Download 2025-26 उपलब्ध झाले असून याबाबतची माहिती पाहूया.
मोबाईलवर एसएमएस आला किंवा नाही
- आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस येईल, परंतु केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये.
- आरटीई पोर्टलवर ‘अर्जाची स्थिती’ या टॅबमध्ये आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे की नाही, याची खात्री करावी.
प्रतीक्षा यादीतील पालकांसाठी सूचना
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी ‘अर्जाची स्थिती’ टॅबमध्ये आपला अर्ज क्रमांक टाकून आपला नंबर तपासावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जातील.
निवड यादीतील (List No. 1) प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत: १४ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५
RTE लॉटरी पहिली यादी PDF डाउनलोड करा
आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज स्थिती आणि महत्वाच्या सूचना
आरटीई २५% ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज स्थिती तपासत असताना पोर्टल काही वेळेस स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
✅ अर्ज भरताना नोंदवलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि साक्षांकित प्रति सोबत न्याव्यात.
✅ अलॉटमेंट लेटरची प्रिंट आपल्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडून काढून घ्यावी.
✅ हमी पत्राची प्रिंट देखील सोबत न्यावी.
‘आरटीई’ प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड – RTE Admit Card Download 2025-26
RTE पोर्टल वर लॉटरीची अंतिम यादी सोडत जाहीर करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पालकांना डाउनलोड करता येणार आहे, ‘आरटीई’ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.
- सर्वप्रथम RTE पोर्टल https://student.maharashtra.gov.in/ वर जा.
- त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर जा.
- त्यांनतर Admit कार्ड या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही RTE Admit Card Download 2025-26 करू शकता.
महत्वाचे – अंतिम यादी सोडत जाहीर होताच RTE साईट वर लोड असल्यामुळे स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.
अशा प्रकारे तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या आणि त्यावरील सर्व माहिती बरोबर आहे का? याची खात्री करा, त्यानंतर जे कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेली होती, ती कागदपत्रे तयार ठेवा.
पालकांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी व अधिक माहितीसाठी अधिकृत आरटीई पोर्टलला भेट द्यावी.