‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, होताच मेसेज (SMS) वर विसंबून न राहता अर्जाची येथे करा पडताळणी RTE Lottery Result status 2025-26

RTE Lottery Result status 2025-26 : ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी सोडत ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली असून, आता लॉटरी यादी व निवड झालेल्या मुलांच्या पालकांना मोबाईल वर लवकरच मेसेज एसएमएस पाठविण्यात येणार आहे. मात्र कधी कधी तांत्रिक अडचणीमुळे SMS न आल्यास तुम्ही ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी आणि अर्जाची स्थिती (www.student.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर चेक करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

राज्यातील 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 फेब्रुवारी रोजी निघाली आहे. आता RTE च्या www.student.maharashtra.gov.in या पोर्टलवर सन २०२५-२०२६ यावर्षीची लॉटरी प्रोसेस करण्याकरिता साईटवर काम सुरू आहे.

साधारणपणे एक-दोन दिवसात RTE Lottery Result PDF Download 2025-26 करण्यासाठी मिळणार आहे. ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर मेसेज मिळाला असेल तर लगेच प्रवेशपत्राची प्रिंट करून घ्या, किंवा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज नसेल मिळाला, तर RTE पोर्टल वर जाऊन चेक करून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेशाची पहिली यादी या तारखेला होणार जाहीर 

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय लॉटरी सोडत यादी पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट www.student.maharashtra.gov.in ला भेट देऊन तिथे तुम्ही यादी पाहू शकता त्यासाठी खालीलमाहिती काळजीपूर्वक वाचा.

आरटीई 25 टक्के प्रवेश जिल्हानिहाय शाळा व रिक्त जागा डायरेक्ट लिंक

RTE  Application Wise Details – आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे चेक करा

Application Wise Details – अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

तिथे HOME पेजवर – Application Wise Details – अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

आता  Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.

RTE Official Website – आरटीई अधिकृत वेबसाईट

RTE Official Website ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment