Anganwadi Sevika Madatnis Bharti : महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या मंजूरी नुसार अंगणवाडी मदतनीसच्या तब्बल 18 हजार 882 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या भरती साठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, मिळणारा पगार आणि अर्ज कोठे करावा? याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत राज्यात एकूण १,१०,५९१ अंगणवाडी केंद्रातील ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनिस रिक्त पदे भरण्यात येत आहे. इच्छूकांनी अर्ज करावे असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केले आहे.
भरतीची संपूर्ण माहिती
✅ भरती प्रकल्प: एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS)
✅ एकूण रिक्त पदे
- अंगणवाडी सेविका: 5,639
- अंगणवाडी मदतनीस: 13,243
✅ अर्जाची अंतिम तारीख: 31 मार्च 2025
✅ भरती ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (त्या-त्या जिल्हानिहाय)
ही सर्व रिक्त पदे दि.३१.३.२०२५ पूर्वी भरण्यात येणार आहे. राज्यातील बाल विकास प्रकल्प क्षेत्रातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांनी त्यांचे निवासी क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध जाहिराती नुसार या पदाकरीता अर्ज करावेत.
अंगणवाडी भरती आवश्यक पात्रता । Anganwadi Recruitment Eligibility
- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सुधारित शासन निर्णय पाहा)
- स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)
- लहान कुटुंब पात्रता आवश्यक (उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत)
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- याव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद इतर पात्रता असणे आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे । Anganwadi Bharti Maharashtra Documents
- शैक्षणिक पात्रता संबंधित 10 वी, 12 वी, पदवीधर व इतर (सर्व कागदपत्रे)
- जन्म दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
- स्थानिक रहिवासी असलेल्या बाबतचा दाखला
- जाहिरातीमध्ये नमूद संबंधित कागदपत्रे
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती शासन निर्णय – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा!
ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार । Anganwadi Sevika, Madatnis Salary
- अंगणवाडी सेविका – 10 हजार रुपये
- मिनी अंगणवाडी सेविका – 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिस (Anganwadi Madatnis Payment) – 5525 रुपये
अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज कोठे करावा?
Anganwadi Bharti साठी इच्छुक महिला उमेदवारांनी तुमच्या तालुका/मनपा स्तरावरील संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
तसेच स्थानिक वृत्तपत्रात देखील जाहिरातीची अधिसूचना दिली जाते. त्याचबाबरोबर तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाहिरात चेक करू शकता. त्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट (उदा. https://jalna.gov.in/) याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. याप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून पुढे gov.in असे गुगल वर सर्च करायचे आणि अधिकृत वेबसाईटवर चेक करायचे आहे.
अधिक माहितीसाठी : मात्र यावर विसंबून न राहता तुमच्या तालुका किंवा मनपा स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात अधिक माहिती घेऊ शकता.
अधिकृत वेबसाईट : icds.gov.in