केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय! राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला मुदतवाढ! NCSK Extension

सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय!

NCSK Extension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा (NCSK) कार्यकाळ ३१ मार्च २०२५ नंतर आणखी तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या आयोगाचा कार्यकाळ ३१ मार्च २०२८ पर्यंत असणार आहे.

या निर्णयाचा काय फायदा होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Commission for Safai Karamcharis Extension : या निर्णयामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल. धोकादायक सफाई करताना होणारी जीवितहानी टाळणे हा देखील या निर्णयाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. या मुदतवाढीसाठी एकूण ५०.९१ कोटी रुपये खर्च येणार आहेत.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा

आयोगाची कार्ये काय आहेत?

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा, 1993 (NCSK) हा सप्टेंबर 1993 मध्ये लागू करण्यात आला आणि ऑगस्ट 1994 मध्ये प्रथमच एक वैधानिक राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्यात आला.

राज्य सरकारने घेतला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

सफाई कर्मचारी संदर्भात महत्वाचे अपडेट येथे पाहा

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी काम करतो. त्यांची काही प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती, सुविधा आणि संधींमधील असमानता दूर करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारशी करणे.
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसनाशी संबंधित कार्यक्रमांचे मूल्यांकन करणे.
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही गटासंदर्भात तक्रारींची चौकशी करणे.
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि वेतनासह कामाच्या परिस्थितीचा अभ्यास करणे.
  • सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित कोणत्याही बाबींवर केंद्र किंवा राज्य सरकारला अहवाल सादर करणे.
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या, सुरक्षेच्या आणि वेतनाच्या समस्यांवर लक्ष ठेवणे.

बंधपत्रित डॉक्टरांना ग्रामीण सेवा बंधनकारक; महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश

सविस्तर तपशीलासह आयोगाची कार्ये

एनसीएसकेचे कार्ये खालीलप्रमाणे आहेत

  • (a) सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती , सुविधा आणि संधींमधील असमानता दूर करण्यासाठी केंद्र सरकारला विशिष्ट कृती कार्यक्रमांची शिफारस करणे;
  • (b) विशेषतः सफाई कर्मचारी विशेषतः मैला हाती वाहून नेणाऱ्या सफाई कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसनाशी संबंधित कार्यक्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीचा अभ्यास आणि मूल्यांकन करणे;
  • (c) विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे आणि (i) सफाई कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही गटासंदर्भातील कार्यक्रम किंवा योजनांची अंमलबजावणी न झाल्यास (ii) सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे इत्यादी; (iii) सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी उपाययोजना इत्यादी, संबंधित बाबींची स्वतःहून दखल घेणे.
  • (d) सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि वेतनासह कामाच्या परिस्थितीचा अभ्यास आणि निरीक्षण करणे,
  • (e) सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित कोणत्याही बाबींवर केंद्र किंवा राज्य सरकारला अहवाल देणे, सफाई कर्मचाऱ्यांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी किंवा अपंगत्वाचा विचार करणे; आणि
  • (f) केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे पाठवल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही बाबी.
  • मैला हाती वाहून नेणारे(मॅ नुअल स्कैवेंजर्स )सफाई कामगार म्हणून काम करण्यास मनाई आणि त्यांचे पुनर्वसन कायदा, 2013 (एमएस कायदा 2013) च्या तरतुदींनुसार, एनसीएसके खालील कार्ये करेल:
  • i. कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे;
  • ii. या कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारींची चौकशी करणे आणि पुढील कारवाईसाठी आवश्यक असलेल्या शिफारशींसह त्याचे निष्कर्ष संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे;
  • iii. या कायद्याच्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला देणे; आणि
  • iv. या कायद्याची अंमलबजावणी न करण्याशी संबंधित बाबींची स्वतःहून दखल घेणे.

अधिकृत वेबसाईट : https://ncsk.nic.in/

Leave a Comment