पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध
Ladkya Bahinicha Labh Parat Nahi : कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.
मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.
२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.
ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: FAQ
प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना 1500 रुपये सन्मान निधी देण्यात येतो.
प्रश्न 2: या योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर: २८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेच्या निकषात बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. (शासन निर्णय पाहा)
प्रश्न 3: मला या योजनेतून वगळण्यात आले आहे, पण मला मिळालेला निधी परत करावा लागेल का?
उत्तर: नाही, तुम्हाला मिळालेला निधी परत करण्याची आवश्यकता नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की अपात्र ठरलेल्या महिलांकडून निधी परत घेतला जाणार नाही. अधिक वाचा..
प्रश्न 4: मला या योजनेचा लाभ कधीपासून मिळणार नाही?
उत्तर: जानेवारी महिन्यापासून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रश्न 5: या योजनेतून कोणाला वगळण्यात आले?
उत्तर: दिनांक २८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी
प्रश्न 6: कोणत्या महिलांना वगळण्यात आले आहे?
उत्तर: लाडकी बहीण योजनेतून खालील लाभार्थी महिलांना वगळण्यात आले आहे.
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
- वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
- एकुण अपात्र महिला – ५,००,०००