सरकारचा मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेतील अपात्र 5 लाख महिलांना मिळालेला आर्थिक लाभ सुरक्षित! Ladki Bahin Scheme Benefits

Ladki Bahin Scheme Benefits : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मिळालेला लाभ परत घेतला जाणार नाही.

कोणत्या लाभार्थ्यांना योजना लागू नाही?

📌 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला२,३०,०००
📌 ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिला१,१०,०००
📌 कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी, तसेच स्वेच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या महिला१,६०,०००
📌 एकूण अपात्र महिलांची संख्या५,००,०००

महत्त्वाचा निर्णय – लाभ परत घेणार नाही!

जानेवारी २०२५ पासून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. (Ladki Bahin Scheme Benefits)
मात्र, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत जमा झालेली रक्कम परत मागण्यात येणार नाही.
कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेतील ‘या’ महिला लाभार्थी अपात्र येथे पाहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.

तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही.

म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी !

Leave a Comment