Bonded Doctor Mandatory Service : बंधपत्रित डॉक्टरांना ग्रामीण सेवा बंधनकारक; महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश

Bonded Doctor Mandatory Service : महाराष्ट्रातील बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती आणि गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

🔹 महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी समुपदेशनाद्वारे तातडीने भरती प्रक्रिया सुरू होणार.
ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिल्याशिवाय कोणतेही “ना हरकत प्रमाणपत्र” (NOC) दिले जाणार नाही.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांचा समन्वय आवश्यक.
औषध पुरवठा सुरळीत करण्यासाठी मध्यवर्ती ऑनलाईन प्रणाली तयार करण्याचा प्रस्ताव.

🔹 रिक्त पदे आणि पदोन्नती प्रक्रिया

📌 15 दिवसांत सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली जाणार.
📌 गट-अ वैद्यकीय अधिकारी पदे एमपीएससी कक्षातून वगळण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार.
📌 राज्य आरोग्य विमा विभागातील वैद्यकीय अधिकारी पदांसाठीही हा नियम लागू करण्याच्या सूचना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ नर्स आणि डीईआयसी पदाची अंतिम निवड यादी

अंगणवाडी भरती 2025 लेटेस्ट अपडेट येथे पाहा

निवासी डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निर्णय

🚑 ग्रामीण आरोग्य सेवेसाठी अंमलबजावणी!

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात सेवा दिल्याशिवाय त्यांना कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे बाधंपत्रित डॉक्टरांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. (Bonded Doctor Mandatory Service)

BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!

आरोग्य विभाग भरती : नियुक्ती न घेणाऱ्या त्या उमेदवारांची नियुक्ती रद्द!

ग्रामीण भागात औषध पुरवठ्याबाबत नवीन योजना

  • ग्रामीण भागात मागणीनुसार औषध पुरवठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येणार आहे.
  • यासाठी इतर राज्यांतील व्यवस्थांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
  • मध्यवर्ती प्रकल्प ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आरोग्य सेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, राज्य आरोग्य विमा आयुक्त अस्तिकुमार पांडे, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवाड, डॉ. बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आव्हाड, उपसचिव श्री. दिपक केंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment