CM Flagship Scheme Review : ग्रामीण भागातील 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी
- शहरी आवास योजनांना गती देण्याचे आदेश
- जल जीवन मिशनची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
- आयुष्मान कार्ड वितरणातील त्रुटी दूर करून 100% वाटपावर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सामाजिक कल्याण योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रासाठी 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज वॉररूममध्ये आरोग्य, गृहनिर्माण व पाणीपुरवठा विभागाच्या फ्लॅगशिप योजनांचा जिल्हानिहाय आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे, राज्यमंत्री पंकज भोयेर, योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्यासह मुख्य सचिव आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती
प्रधानमंत्री आवास योजना – घरकुलांच्या कामांना गती द्या
- भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित लाभार्थ्यांसाठी तातडीने जमिन उपलब्ध करून द्यावी.
- ज्या जिल्ह्यांत उद्दिष्टपूर्ती कमी आहे, तेथील कामांना प्राधान्य द्यावे.
- गायरान जमिनींवरही आवास योजना राबवण्यासाठी कार्यवाही करावी.
- घरकुलांसाठी आवश्यक वाळू, वीटा, सिमेंट एकाच ठिकाणी मिळावे यासाठी “घरकुल मार्ट” संकल्पना राबवावी.
- बचत गटांच्या माध्यमातून घरकुल बांधणीस मदत घ्यावी.
गुड न्यूज! तालुकास्तरावर महिलांसाठी ‘अस्मिता भवन’ उभारावे– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
आयुष्मान कार्ड वितरण जलदगतीने पूर्ण करा
- आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात.
- कार्ड वाटपाची प्रक्रिया 100% पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.
- राज्यभरात अधिकाधिक खाजगी आणि महानगरपालिका रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट करावे.
- म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठीही आयुष्मान कार्डसारखेच नवे कार्ड तयार करावे.
जल जीवन मिशन – दर्जेदार व जलद कामे पूर्ण करा
- ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वेळेत मिळावे यासाठी मिशनच्या कामांना गती द्यावी.
- या योजनांमध्ये सोलारायजेशन केल्यास वीज व वीजबिलाची बचत होईल.
- पाणी गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी वर्षातून 2 वेळा जीवाणूजन्य आणि 1 वेळा रासायनिक चाचणी करावी.
- पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांमधील रिक्त पदे त्वरित भरावीत.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे आणि नागरिकांना वेळेत लाभ मिळावा.
राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! NPS चा मार्ग झाला सुलभ!
#Maharashtra #PMAY #AyushmanBharat #JalJeevanMission #DevendraFadnavis