RTE प्रवेशासाठी दुबार अर्ज? काळजी नको! अर्ज रद्द करण्याची संधी! RTE Double Form Cancellation

RTE Double Form Cancellation : शालेय शिक्षण विभागाने RTE (Right to Education) २५% प्रवेश प्रक्रियेत दुबार अर्ज म्हणजेच चुकून दोनदा सबमिट झालेल्या अर्जा बाबत महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

तुम्ही RTE अंतर्गत अर्ज भरला आहे तर यासाठी आता दुबार अर्ज रद्द करण्यासाठी ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संधी देण्यात आली आहे.

RTE (Right to Education) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेशासाठी दि.२-२-२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE प्रवेश प्रक्रिया: कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आले? येथे पाहा

या नोंदणीमध्ये बालकांचे दुबार अर्ज भरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी असे दुबार अर्जाची नोदंणी झाली असल्यास असे अर्ज डिलीट करण्यासाठी दिनांक ३-२-२०२५ ते दि.६-२-२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठी नवीन नियमावली

दुबार नोंदणी झालेले अर्ज आपल्या लॉगिनवरून डिलीट करून बालकांच्या प्रवेशाचा एकच अर्ज राहील याची दक्षता घेण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी संबंधित जिल्हा परिषद व मनपा यांना कळविले आहे.

अधिक माहितीसाठी : आरटीई पोर्टलवर भेट द्या

शालेय शिक्षण विभागाचा नवीन निर्णय: शैक्षणिक वर्ष 2025 पासून पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे बदल!

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाबाबत महत्त्वाचा अहवाल प्रकाशित – ‘असर 2024’ अहवालातील ठळक निष्कर्ष 

Leave a Comment