एसटी प्रवासात सुट्ट्या पैशांची कटकट मिटली! UPI पेमेंटला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद! Android Electronic Ticket Issuing Machine

Android Electronic Ticket Issuing Machine : प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत, असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

एसटी बसचे नवे दर जाहीर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एसटी बसचे भाडे वाढण्यामागे काय कारण? या तारखेपासून भाडेवाढ लागू

यूपीआय पेमेंट कसे करावे? | Android Electronic Ticket Issuing Machine

Android Electronic Ticket Issuing Machine : एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून तुम्ही यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढू शकता.

त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री श्री. सरनाईक यांनी केली होती.

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला

त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

एसटी बसचे भाडे वाढण्यामागे काय कारण? या तारखेपासून भाडेवाढ लागू

Leave a Comment