सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नवीन निवृत्तिवेतन योजना लागू! विकल्प देण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत New pension scheme

New Pension Scheme : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा विकल्प देण्याची मुदत जवळ आली आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ नुसार अनुज्ञेय असलेली जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस, अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती.

समितीने सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करुन सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तिवेतन योजना दि.२४.०८.२०२४ रोजी जाहीर केली असून, प्रस्तुत योजनाही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन निर्गमित

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना दिनांक ०१.०३.२०२४ पासून लागू करण्यात येत आहे. (सोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे)

त्याचबरोबर केंद्र सरकारने दि.२४.०८.२०२४ रोजी घोषित केलेली ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गट विमा योजनेचे नवीन दर जाहीर!

(Unified Pension Scheme) शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. (सोबतच्या परिशिष्ट-ब प्रमाणे)

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील.

राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा (One Time Option) विकल्प दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांचेकडे सादर करावा.

सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची वैशिष्ट्ये येथे पाहा

मात्र सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा वरीलप्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करुन ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल तर त्यासंदर्भातील विकल्प दिनांक ३१.०३.२०२७ पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील. तद्नंतर सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘पेन्शन’ योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय

केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्यानुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारीत निवृत्तिवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत. सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखडयामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तिवेतन योजना आपोआप लागू राहील.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू

Leave a Comment