महिला व बालविकास विभागातील विविध योजना व समस्यांबाबत बैठक संपन्न, बैठकीतील मुद्दे Mahila V Balvikas Vibhag Meeting

Mahila V Balvikas Vibhag Meeting : महिला व बालविकास विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी, तसेच विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी (दि 29) रोजी महिला व बालविकास मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले, सविस्तर वाचा

महिला, बालक व दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी व सबलीकरणासाठी राज्यभरात निर्माणाधीन असलेल्या अहिल्या भवनांच्या उभारणीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

“पिंक ई रिक्षा” योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी पाच हजार पात्र महिलांना रिक्षांचे वितरण करण्यासंबंधी प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेले फिरते पथक आता राज्यभरात व्यापक स्वरूपात सुरू करावेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही सविस्तर येथे वाचा

नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करावेत.

Mahila V Balvikas Vibhag Meeting

नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजू महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. पाळणाघर से‍विका व मदतनिस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी उपस्थित समन्वयक महिलांना सांगितले. तसेच, माध्यमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधुन उपाययोजना आखण्यासंदर्भातही निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी 

प्राथमिक शिक्षणातून माध्यमिक शिक्षणात प्रवेश करणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागासोबत समन्वय साधून कार्यक्रमाची आखणी करावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध

यासोबतच राज्यातील महिला व बालकांच्या हितासाठी विविध विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार

Leave a Comment