महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती मिळणार, महिला व बालविकास मंत्री यांचे निर्देश Anganvadi News

Anganvadi News : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘ मिशन वात्सल्य ‘, ‘ मातृवंदना योजना ‘, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? तारीख पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुसूत्रता आणावी

महिला व बालकांच्या विकासासाठी राष्ट्रीय मंथन करण्याच्या हेतूने भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने उदयपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरात महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती मिळणार

लाडकी बहीण’ योजना – सुधारित निकष येथे पाहा

महिलांच्या उन्नतीसाठी व बालकांच्या पोषणासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुसूत्रता आणावी अशी भावना व्यक्त केली.

हे ही वाचा : सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी | कंत्राटी कर्मचारी बदली बाबत | करार कर्मचारी पगार वाढ GR | अंगणवाडी व मदतनीस कर्मचारी | शासन सेवेत समायोजन | HSC हॉल तिकीट

महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला असून याबाबत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पाठबळ मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहाय्य दिले जाईल असे आश्वासन केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांनी दिले.

राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार

राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. भजनलालजी शर्माजी, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी जी, उपमुख्यमंत्री श्रीमती दिया कुमारी जी , केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्रीजी ठाकूर आणि भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेले हे चिंतन शिबिर महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरेल, या वाटचालीत महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक ठरेल हा मला विश्वास आहे.

Leave a Comment