मोठी बातमी! मंत्रालयात सुलभ सुरक्षित प्रवेशासाठी राज्य शासनाने घेतला महत्वाचा निर्णय! State Government Decision Ministry security

State Government Decision Ministry security : नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम रहावी, यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे, मंत्रालयात दि २ जानेवारी २०२५ रोजी आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या प्रलंबित कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते, परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा (Artificial Intelligence) उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महत्वाचे अपडेट्स : आजच्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय पाहा | CTET परीक्षेची उत्तरसूची पाहा | RTE 25 टक्के प्रवेश अपडेट | कर्मचारी अपडेट्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात.

अधिवेशनादरम्यान तर विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेल्या सुरक्षा पासेस देण्यात याव्यात. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भुयारी मार्गामध्ये विधान भवनात जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेश मार्ग उपलब्ध करून द्यावा.

मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यास मध्ये लावलेली सुरक्षा जाळे काढून टाकावे. मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

Leave a Comment