Poshan Tracker App : राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ऍप वर ऑनलाईन पद्धतीने काम करावे लागते, आता Poshan Tracker App Update Download आवृत्ती 22.4 यामध्ये बदल करण्यात आला असून, अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे.
Poshan Tracker App Update Download 22.4
Anganwadi Poshan Tracker : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोषण ट्रॅकर ऍप मध्ये अंगणवाडीमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅकर ऍप मध्ये केली जाते.
मध्यंतरी पोषण ट्रॅकर ऍप मध्ये बदल करण्यात आला असून हे ऍप इंग्रजी भाषेतून होते. संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेतून भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) यांना इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात होते.
मात्र आता पोषण ट्रॅकर ऍप मराठी भाषेत झाल्याने अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांना Poshan Tracker App ची 22.4 ची आवृत्ती Update करून Download करून घ्यावे लागणार आहे. (Poshan Tracker App Update Download 22.4)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री यांचा महत्वपूर्ण निर्णय
अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राची सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण याबरोबरच दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत (Poshan Abhiyan) पोषण ट्रॅकर ऍप गरोदर, स्तनदा मातांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर ऍप वर नोंदी ठेवल्या जातात.