Salary Arrears : केंद्र पुरस्कृत योजनेतील या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर, शासन निर्णय जारी

Salary Arrears : केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील वेतन तांत्रिक कारणांमुळे थकीत होते. मात्र आता दिनांक २६ डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार या कालावधीतील थकीत वेतनाची रक्कम (Salary Arrears) मंजूर करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने सन १९७८ पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) Integrated Education Scheme for the Disabled सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेंतर्गत विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती, त्यानंतर माध्यमिक युनिटवर देखील विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती, या नियुक्त कार्यरत असलेल्या माध्यमिक विशेष शिक्षकांना एप्रिल, २०२२ ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील वेतन दि.३०.११.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

करार कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के वाढ; या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम

कंत्राटी विशेष शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू – परिपत्रक पाहा

तथापि, तदनंतर सदर विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील वेतन तांत्रिक कारणांमुळे थकीत होते. यास्तव शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ५२ विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन (Salary Arrears) अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती शासनास केली आहे.

शिक्षण सेवक लागू न करता थेट नियमित वेतनश्रेणी देण्याबाबत शासन निर्णय पाहा

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मागणी केल्यानुसार अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि, माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या ५२ विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर, २०२३ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी रु.५,१४,१९,८५४/- (रु. पाच कोटी चौदा लक्ष एकोणीस हजार आठशे चोपन्न फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय पाहा

लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट येथे पाहा

महत्वाचे अपडेट्स : महानगरपालिका जॉब्स | ITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा

आशा सॉफ्टवेअर कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविकांना मोफत टॅब

Leave a Comment