Group Promoter Increase Sallery : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय आणि निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर वाढीव मानधन दिनांक 1 एप्रिल 2024 पासून वाढीव मानधन सह फरकाची रक्कम कधी मिळणार याबाबत सविस्तर अपडेट पाहूया.
राज्यातील गटप्रवर्तकांचे वाढीव मानधन फरकासहित रक्कम कधी मिळणार?
दिनांक 1 एप्रिल 2024 पासून गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ झाली आहे, मात्र प्रत्यक्ष लाभ गटप्रवर्तकांना मिळालेला नाही. यासंदर्भात आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे शिष्टमंडळ यांनी प्रोग्राम ऑफिसर स्वाती पाटील यांची भेट घेतली, व वाढीव मानधन लवकरात लवकर देण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजार रुपयांची वाढ करण्यासंदर्भात चा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच गटप्रवर्तकांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी बजेट देखील मंजूर करण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्याचे राहिले असून ही वाढीव मानधन फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्यक्ष गटप्रवर्तकांना दिनांक 1 एप्रिल 2024 पासून वाढीव फरका सहित रक्कम मिळेल, असे आश्वासन आशा व गटप्रवर्तक फेडरेशनला मिळाले असून याबाबत सतत पाठपुरावा करत असून, गटप्रवर्तकांनी कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये असे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्या अध्यक्षा कॉ आनंदी अवघडे यांनी सांगितले आहे.
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख पाहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर
केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना, 7 हजार रुपये महिना – सविस्तर येथे पाहा