Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओवरे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळ्या स्तरावरुन या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? तारीख पहा
या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार
केंद्र सरकारकडून महिलांसाठी दरमहा 7000 रुपये विद्यावेतन देणारी योजना – येथे पाहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संदर्भात दोन शासन निर्णय निर्गमित
सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन देण्यात येणार आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती – माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अधिकृत माहिती येथे पाहा
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना – वेबसाईट
अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

