Permanent Special Teacher : राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! दिव्यांगांसाठी आता कायमस्वरूपी विशेष शिक्षक मिळणार

Permanent Special Teacher : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये केंद्र स्तरावर विशेष शिक्षकांची पद निर्मिती आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय दि 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

याबाबतचा शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे आता राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आता कायमस्वरूपी विशेष शिक्षक (Permanent Special Teacher) मिळणार आहे.

विशेष शिक्षक पदनिर्मिती आणि कंत्राटी शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय

राज्यातील समग्र शिक्षा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी विशेष शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालय रिट याचिका क्र १३२/२०१६ नुसार शासन सेवेत सामावून घेण्याचा महत्वपूर्ण राज्य शासनाने घेतला असून, गेल्या 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय दि 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सद्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदांवर समायोजन करण्यात येईल. तसेच उर्वरित पदांवर भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे ४८६० पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात येणार आहे.

3 डिसेंबर जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार ५७२ विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) यासाठी ३५८ शिक्षक, आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) ५४ पदे अशा एकूण दोन हजार ९८४ शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.

याबाबतची कार्यवाही आता सुरू झाली असून, लवकरच दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी विशेष शिक्षक (Permanent Special Teacher) मिळणार आहे. (शासन निर्णय येथे पाहा)

शासन सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू – परिपत्रक पाहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ! परिपत्रक जारी

राज्यातील अंगणवाडी संदर्भात 2 महत्वाचे शासन निर्णय जारी

मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

Leave a Comment