Contractual Employees Regularisation : राज्यातील 2984 कंत्राटी विशेष शिक्षकांच्या समयोजनाचा शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला होता, याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून, या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे पडताळणी करण्याचे महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायम स्वरूपी स्थायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे रिट याचिका क्र. १३२/२०१६ दाखल झाली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे अनुपालन करण्याच्या अनुषंगाने राज्य पातळीवर विशेष शिक्षक या पदाचा नव्याने समावेश करून राज्यात सद्यस्थितीत उपलब्ध रिक्त शिक्षकीय पदांपैकी, प्रत्येक केंद्र स्तरावर १ या प्रमाणे ४८६० पदे विशेष शिक्षकाच्या नियुक्तीकरीता राखून ठेवण्यास आणि राखून ठेवण्यात आलेल्या रिक्त पदांवर २९८४ विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास दि. ८.१०.२०२४ रोजीच्या संदर्भिय शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ! परिपत्रक जारी
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य
सदर शासन निर्णयानुसार समायोजनाची कार्यवाही करण्याकरीता मा. आयुक्त (शिक्षण) यांनी दिलेल्या मान्यतेनुसार दि. ८/१०/२०२४ रोजीच्या शासन निर्णयात नमूद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत सद्यस्थितीत कार्यरत २५७२ विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शासन निर्णय नुसार समायोजनास पात्र विशेष शिक्षकांची यादी सादर करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP) यांना अधिकार देण्यात आले आहे.
कागदपत्र पडताळणीअंती पात्र विशेष शिक्षकांची यादी अंतिम करून या कार्यालयास उपलब्ध करून देण्याची कार्यवाही ३० दिवसामध्ये पूर्ण करणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पात्र विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना