Employees Election Duty GR : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली, यादरम्यान निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबतचा शासन निर्णय काय आहे? सविस्तर पाहूया.
निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देणेबाबतचा शासन निर्णय
भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एक किया अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका, म्हणजेच राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी/कर्मचारी वर्ग निवडणूक विषयक विविध कर्तव्यावर नेमण्यात येतो.
निवडणूक कर्तव्ये ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात. ती केवळ मर्यादीत वेळेत पूर्ण करावयाची नसतात, तर ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाऱ्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे निवडणूक कर्तव्ये बजावताना निधन पावलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तसेच निवडणूक कर्तव्यावर असताना कोणतीही दुर्दैवी घटना (Any mishap) घडून जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करुन यापूर्वीच 2019 मध्ये पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
- या शासन निर्णयासाठी निवडणूक कर्तव्य याचा अर्थ संबंधीत अधिकारी/कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून / कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये पार पाडून आपल्या कार्यालयात/घरी परत येईपर्यंतचा कालावधी असा समजण्यात यावा.
- निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल. या कालावधीमध्ये कोणतीही दुर्दैवी घटना (Any mishap) घडल्यास ती निवडणूक कर्तव्यावर असताना घडलेली आहे असे समजण्यात येईल. तथापि, निवडणूक कर्तव्य व घडलेला मृत्यु यामध्ये नैमित्तिक संबंध (Casual Connection) असावा,
- निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, निम शासकीय इतर प्राधिकरण तसेच इतर खाजगी आस्थापना की ज्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत असे अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे.
- हे सानुग्रह अनुदान शासनाच्या प्रचलित सोई सुविधा, अनुज्ञेय लाभ या व्यतिरिक्त आहे. यामध्ये सदर अधिकारी/कर्मचारी यांना मिळणाऱ्या नियमित लाभाचा समावेश नाही.
- सदरचा शासन निर्णय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम २ (१) (ड) मध्ये नमूद केलेल्या सर्व निवडणुकांकरिता लागू आहे.
- सानुग्रह अनुदानाकरिता लागू कालावधी हा निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून सुरु होईल.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी
साहेब एक वेलेस अनुकंप भर्ती केली तर स्टाफ्फ पन मीलेल आनी आम्ची उपवास मारिची वेल थाबेंल आपल्यावर्च आशा आहे आमचि
आनि ति पूर्ण कराल
आपला कार्यकर्ता
सचिन रामचन्द्र वाघमारे
9637396127
जल सम्पदा विभाग नांदेड