Maharashtra Poll Counting : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये यंदा राज्यात सरासरी 65.05 टक्के मतदान झाले असून, दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे, नेमकी मतमोजणीची व्यवस्था कशी असते? जाणून घ्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानात वाढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. यानुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले, ज्यांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दिसून आली.
मतमोजणी व्यवस्था
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 01 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 02 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत.
23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.
मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून, सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी दिली आहे.
विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा
या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
मतदानाची अंतिम आकडेवारी – मतदारसंघ निहाय पाहा
निवडणूक लढविणारा उमेदवार/राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील.
मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.
सध्याच्या निवडणुकीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एनआयसी (NIC) च्या मदतीने फॉर्म 12 आणि 12-डी त्वरित हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली. मंजूर फॉर्मसाठी रिकाम्या पोस्टल मतपत्रिकांची देवाण-घेवाण तसेच मतदान केलेल्या मतपत्रिकांच्या विनिमयासाठी जिल्हा, विभागीय, आणि राज्य स्तरावर समन्वय केंद्रे कार्यरत करण्यात आली.
85+ वयाच्या 68,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि 12,000 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. 36,000 हून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले आणि 4,66,823 पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या.
सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 1732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस (ETPBMS) स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सतत माध्यमांसमोर माहिती सादर करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे आकडेवारी व घडामोडी ऑनलाइन व पारंपरिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे.
तुमच्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर पाहा
अधिक माहितीसाठी : https://www.eci.gov.in/