Schools Holiday New Guidlines : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत शिक्षण विभागाने आता सुधारित आदेश काढले असून, दिनांक 18 व 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर याबाबत स्पष्ट केलं आहे.
राज्यातील क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत गेल्या दोन दिवसामध्ये काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले होते.
त्यानुसार आता पुन्हा दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाने याबाबत सुधारित सूचना दिल्या असून, याबाबतीत असे कळविण्यात आले आहे की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच या दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.
केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी परिपत्रक पाहा
जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे ‘सुधारित वेळापत्रक’ जाहीर