महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Short Typist Exam Result Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पद, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पद, इतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या – त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

निकाल येथे पाहा

राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार

जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे ‘सुधारित वेळापत्रक’ जाहीर

 MPSC Short Typist Exam Result Announced

Leave a Comment