Adjustment of Teachers : शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाढीव पदावरील 18 पात्र शिक्षकांच्या समायोजन आदेशाचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असे सांगून श्री.केसरकर यांनी समायोजित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यावेळी उपस्थित होते.
वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन (Adjustment of Teachers) करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी मुंबई विभागातील 21 शिक्षकांना मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते 10 जानेवारी 2024 रोजी समायोजनाचे आदेश देण्यात आले होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय! नेमके बैठकीत काय झाले सविस्तर वाचा
त्यानंतर, यापूर्वी समायोजन न झालेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश 7 मार्च 2024 रोजी प्राप्त झाल्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 16 वाढीव पदावरील कार्यरत शिक्षकांचे समायोजन केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
मात्र काही पात्र शिक्षकांना समायोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध नव्हते, अशा शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रिक्त जागांचा आढावा घेऊन पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासनास विनंती केली होती, त्यानुसार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या चर्नी रोड येथील राज्य प्रकल्प संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते 18 शिक्षकांना हे वाटप आदेश देण्यात आले.
या कार्यक्रमास संबंधित शिक्षकांसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य शासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.