Anganwadi Asha Sevika Allowance : राज्यातील शहरी व ग्रामीण गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहता आणि महिलांच्या सूचना विचारात घेता या योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात येत असून,आता या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी हे कर्मचारी अधिकृत असणार
सदर सुधारित शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
ग्रामस्तरीय समिती व कार्यपद्धती
गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची “ग्रामस्तरीय समिती” स्थापन करण्याबाबत कळविण्यात आले असून, या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहे.
हे ही वाचा : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू
सदर समितीचे कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे.
- सदर समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करणे.
- सदर शिबिरामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करून ऑफलाईन अर्ज यथावकाश अॅप, पोर्टलवर भरणे.
- ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करणे.
- तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करणे.
- सदर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात करणे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी समिती
शासन निर्णय दि.०५.०७.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने, या महानगरपालिका क्षेत्राकरीता “तालुकास्तरीय समिती” ऐवजी “वार्ड स्तरीय समिती” गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादीत न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी.
अंगणवाडी सेविका, आशा सेविका व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार
Anganwadi Asha Sevika Allowance : नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप, पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा