कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची भरघोस वाढ

Contract Basis Employees Salary Increase : राज्यातील विद्युत विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या कर्मचाऱ्यांच्या वेतन, विविध भत्ते आणि मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maha Nirmitri), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Maha Pareshan) या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये खालीलप्रमाणे ऐतिहासिक वाढ (Salary Increase) करण्याचा निर्णय दिनांक 7 जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

  • अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 19% वाढ करण्यात आली आहे.
  • या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या भत्यामध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे.
  • तसेच वीज कंपनीमध्ये कार्यरत 3 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.
  • लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता रु. 500 वरून रु. 1000 देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिनांक 7 जुलै रोजी बैठक संपन्न झाली, या बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या वेतन (Employees Salary Increase) आणि विविध भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment