Computer Operators : राज्यातील 20 हजार संगणक परिचालकांच्या प्रश्नावर सरकारने तात्काळ ठोस कार्यवाही करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
कंत्राट नुतनीकरण न झाल्याने राज्यभरातील 20 हजार संगणक परिचालक बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. अगोदरच कायमस्वरूपी नोकरी नसल्याने आणि अल्प मानधन असल्याने संगणक परिचालक (Computer Operators) मानसिक तणावात असताना आता बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
परिणामी राज्यभरातील संगणक परिचालक संपावर जाण्याची तयारी करत असून तसं झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तरी संबंधित प्रश्नावर सरकारने तात्काळ ठोस कार्यवाही करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, ही विनंती! असे X वर पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी शासनांचे लक्ष वेधले आहे.
अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता आणि या योजनेचा लाभ मिळणार
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
केंद्र सरकारच्या डिजिटलायझेशनच्या धोरणानुसार राज्य सरकारने 2011 मध्ये ‘ई – पंचायत’ प्रणाली सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सरकारी योजना व विविध सेवांचा लाभ हा थेट संगणकाद्वारे देण्याची योजना आणली. यासाठी ‘CSC-SPV’ या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 20 हजार युवकांना संगणक परिचालक (Computer Operators) म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले होते.
मात्र ‘CSC-SPV’ चे कंत्राट 30 जून 2024 रोजी संपुष्टात आले असून 20 हजार संगणक परिचालकांची सेवाही 1 जुलैपासून संपुष्टात आली आहे. तर अद्यापही ‘CSC-SPV’च्या जागी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि नवीन संस्थेकडे कंत्राट गेल्यास संगणक परिचालक म्हणून नियुक्ती होईल का? अशी संभ्रम अवस्था या कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
जुनी पेन्शनसंदर्भात महत्वाची बैठक संपन्न – बैठकीतील ठळक मुद्दे पाहा
ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्याची मागणी
नवीन खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न करता संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेण्याची मागणी संगणक परिचालकांनी केली आहे.
या मागणीसाठी येत्या दि 16 ऑगस्टपासून राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येतील, तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने दिला आहे.
राज्यातील या शिक्षकांना मोठा दिलासा
