महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार

Maha Hssc Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.

माध्यमिक इयत्ता (१० वी) आणि उच्च माध्यमिक इयत्ता (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणार असून, या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या Maha Hssc Board या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा, महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (Maha Hssc Board) मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉलतिकीट (Hall Ticket), प्रवेशपत्रे (Admit Card) ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत.

राज्यातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय!

शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस, महाविद्यालयास कळवावे.

प्रवेशपत्र (Admit Card) गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी : www.mahahsscboard.in

Leave a Comment