26 January Activities : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करावयाचे उपक्रम कोणते? संपूर्ण यादी

26 January Activities : दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्य शासनाने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबत शासन परिपत्रक द्वारे कळविले आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणकोणते उपक्रम घ्यावेत याची संपूर्ण यादी आजच्या लेखात दिली आहे.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उपक्रमाची यादी । 26 January Activities

१) प्रभात फेरी : शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी.

२) भाषण स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

३) कविता स्पर्धा : विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे.

४) नृत्य स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

५) चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी.

६) निबंध स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी.

७) खेळ : विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत.

८) प्रदर्शनी : विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी.

वरील उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करण्यात यावा, अशा सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक येथे पाहा

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, अधिकृत लिंक

नवोदय विद्यालय हॉल तिकीट डाउनलोड करा

राज्यातील सर्व कार्यालयात जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना ‘जयंती फलक’ माहिती येथे पाहा

प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो?

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले आहे. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (26 January) म्हणून साजरा केला जातो.

सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शाळांकडून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (26 January) म्हणून साजरा करण्यात येतो.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 5000 पदांसाठी रोजगाराची संधी!

शासन परिपत्रक

प्रजासत्ताक दिनांकानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात. सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे. सदर सूचनांच्या पालनासह दिनांक २६ जानेवारी, २०२५ पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबवावेत. यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा.

दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह (26 January Activities) साजरा करणेबाबत कळविण्यात आले आहे.

Leave a Comment